अलिबाग तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाला प्रारंभ


अलिबाग (प्रतिनिधी): महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार अलिबाग तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाच्या टप्पा क्र. १ ची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या अभियानास रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे तसेच अलिबागचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले असून, तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी विक्रम पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंडळ स्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.
अभियानाची प्रमुख उद्दिष्टे :
नागरिकांच्या महसुली तक्रारींचे तात्काळ निराकरण
प्रलंबित प्रकरणांचा आढावा व जलद कार्यवाही
विविध दाखल्यांशी संबंधित अडचणी दूर करणे
प्रशासन व नागरिक यांच्यात थेट संवाद प्रस्थापित करणे
नियोजित शिबिर स्थळे :
सारळ – सारळ गावदेवी मंदिर
किहीम – झिराड ग्रामपंचायत हॉल
कामार्ले – चिंचवली  ग्रामपंचायत हॉल
पोयनाड – कुसुंबळे ग्रामपंचायत हॉल
चरी – पेझारी ग्रामपंचायत हॉल
रामराज – बेलाशी ग्रामपंचायत हॉल
चौल – खनाव ग्रामपंचायत हॉल
नागाव – मंडळ अधिकारी कार्यालय
अलिबाग – नगर परिषद हॉल
शिबिरात दिल्या जाणाऱ्या सेवा :
सातबारा उतारे व फेरफार नोंदी
नामांतरण व वारस नोंद प्रक्रिया
उत्पन्न, जाती व निवासी दाखले
इतर महसुली तक्रारींचे निवारण
जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यावर भर दिला आहे. उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी शिबिरांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आवश्यक समन्वय साधण्याच्या सूचना दिल्या आहेत. तहसीलदार विक्रम पाटील यांनी नागरिकांनी संबंधित कागदपत्रांसह शिबिरात उपस्थित राहून शासनाच्या या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
या अभियानामुळे तालुक्यातील महसुली प्रकरणांना गती मिळून नागरिकांना स्थानिक स्तरावरच जलद व पारदर्शक सेवा मिळणार आहे.