अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग येथे राजकीय घडामोडींना वेग आला असून भारतीय जनता पक्ष (भाजप) मध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश पार पडला. शिंदे गटाची शिवसेना तसेच शेतकरी कामगार पक्ष यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत आगामी राजकीय समीकरणांना नवा आयाम दिला आहे.
अलिबाग तालुक्यातील थेरोंडा व आग्राव गावांतील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्यात भाजप नेते आस्वाद पाटील यांनी दमदार भाषण करत आगामी विधानसभा निवडणुकीचे संकेत दिले. “मी आयपीएलमधील बॅट्समनप्रमाणे मैदानात उतरलो आहे; खेळणार आणि जिंकणारच,” असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. भविष्यातील आमदारकीसाठी आपण सज्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला रायगड महिला मोर्चा अध्यक्षा चित्राताई पाटील, राजू साळुंके, संदीप घरत, ॲड. अंकित बंगेरा, संजय पाटील, प्रियदर्शनी पाटील, मंजुषा कुद्रेमूती आणि गिरीश तुळपुळे आदी मान्यवर उपस्थित होते.
पक्षप्रवेशामुळे अलिबाग परिसरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे. भाजपची ताकद ग्रामीण भागात वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी विकासाच्या मुद्द्यांवर काम करण्याची ग्वाही दिली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश भाजपसाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
Home ताज्या बातम्या “मी IPL चा बॅट्समन, खेळणार आणि जिंकणारच” – भविष्यातील आमदारकीसाठी आस्वाद पाटील...









