सिंगापूर व्यापारी करार चर्चेसाठी खासदार गटाचे नेतृत्व सुप्रिया सुळेंकडे; मोदी सरकारकडून मोठी जबाबदारी


नवी दिल्ली(प्रतिनिधी): सुप्रिया सुळें यांच्यावर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार कडून महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सिंगापूरसोबतच्या प्रस्तावित व्यापारी करारावर चर्चा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या खासदारांच्या प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व त्या करणार आहेत. या निर्णयामुळे संसदीय पातळीवर त्यांच्या अनुभवावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
भारत आणि सिंगापूर यांच्यातील आर्थिक व व्यापारी संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने हा करार महत्त्वाचा मानला जात आहे. गुंतवणूक, तंत्रज्ञान सहकार्य, सेवा क्षेत्र आणि निर्यात वाढ या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होणार आहे. विविध पक्षांच्या खासदारांचा समावेश असलेल्या या गटामार्फत द्विपक्षीय संबंधांना नवी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वामुळे चर्चेला संतुलित व अभ्यासपूर्ण दिशा मिळेल, असा विश्वास राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.