महाआवास अभियानाअंतर्गत रायगड जिल्हा परिषदेचे उत्कृष्ट काम विभागस्तरावर विविध पुरस्कारांनी गौरव


अलिबाग (प्रतिनिधी): महाआवास अभियांतर्गत उत्कृष्ट काम करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेला कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते बुधवारी (ता.२५) गौरविण्यात आले. नवी मुंबई येथील सिडको भवन येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
गुणवत्ता वाढीसाठी राज्यात सन २०२१-२२, सन २०२२-२३ व सन २०२३-२४ या कालावधीत महाआवास अभियान राबविण्यात आले. या अभियानात राज्य पुरस्कृत आवास योजना २०२१-२२ सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद विभागात तृतीय क्रमांक, प्रधानमंत्री आवास योजना २०२२-२३ सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद विभागात तृतीय क्रमांक, प्रधानमंत्री आवास योजना २०२३-२४ सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद विभागात तृतीय क्रमांक, राज्य पुरस्कृत आवास योजना २०२३-२४ सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद विभागात द्वितीय क्रमांक यासोबतच राज्य पुरस्कृत आवास योजना २०२२-२३ सर्वोत्कृष्ट पंचायत समिती विभागात पनवेल पंचायत समितीला प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले.
या कार्यक्रमात कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. हा पुरस्कार मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे यांनी स्वीकारला.