अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग प्रेस असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार चषक क्रिकेट क्रिकेट स्पर्धेत गोरेगाव प्रेस क्लबने विजेतेपद पटकावले. यजमान अलिबाग प्रेस असोसिएशनचा संघ उपविजेता ठरला. महाड प्रेस असोसिएशनने तृतीय तर पेण प्रेस क्लबने चतुर्थ क्रमांक मिळवला.
अलिबाग प्रेस असोसिएशनतर्फे रविवारी (दि.१) रायगड जिल्हा क्रीडसंकुल , नेहुली येथे पत्रकारांची क्रिकेट स्पर्धा २०२६ आयोजित करण्यात आली होती. गोरेगाव संघाचा आदिनाथ गोविलकर या स्पर्धेचा मानकरी ठरला. अलिबागचा प्रदीप ठाकूर याची उत्कृष्ट गोलंदाज म्हणून तर पेण संघाचा नित्यानंद पाटील याची उत्कृष्ट फलंदाज म्हणून निवड करण्यात आली.
अलिबाग – मुरुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, नगरसेवक एड. अंकित बंगेरा, माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान, आर सी एफ.चे निवृत्त जनसंपर्क अधिकारी संतोष वझे, रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी , रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
सहयोग पतसंस्थेचे अध्यक्ष तथा रायगड जिल्हा पतसंस्थांचा महासंघाचे सेक्रेटरी योगेश मगर, सनदी लेखापाल संजय राऊत, नागेश कुलकर्णी आदींच्या उपस्थित स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अलिबाग प्रेस असोसिएशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.









