अलिबाग प्रेस असोसिएशनचे तेजस्विनी पुरस्कार जाहीर


अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग प्रेस असोसिएशनतर्फे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तुत्ववान महिलांना तेजस्विनी पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. २०२६ चे तेजस्विनी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. वंदना विजय सुर्वे , देविका देवेंद्र पाबेकर ,सारा अभिजित वर्तक , प्राची विवेक देवळे,प्रियांका अमोल घरत यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

शनिवारी (दि. ७) सकाळी  १०    वाजता जंजिरा सभागृह, पोलीस परेड मैदान, रायगड पोलीस मुख्यालय, अलिबाग येथे आयोजित करण्यात आलेल्या समारंभात तेजस्विनी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

रायगड पोलीस अधीक्षक आँचल दलाल, रायगड जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पूर्वा पाटील , रायगड जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.