महाड (रेश्मा माने): महाड पंचायत समिती सभापतीपदी सौ प्रेरणा जितेंद्र सावंत तर उपशभापतीपदी सुरेश शांताराम महाडिक यांची बिनविरोध निवड झाली
महाड पंचायत समितीच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे९ सदस्य असल्याने. पंचायत समिती सभापती उपसभापती पदाची निवडणूक आज बिनविरोध पंचायत समितीच्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सभागृहात पार पडली
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सभागृहात महाडचे उपविभागीय दंडाधिकारी पोपट उमासे ,तहसीलदार महेश शितोळे, महाडचे गटविकास अधिकारी साळुंखे शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख रविंद्र उर्फ बंधू तरडे, महाड नगरपालिकेचे माजी नगरसेवक नितीन पावले, यांच्यासह नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य अनिल जाधव, संदीप खिडबडे, सौ नूतन गोपाळ मोरे, दिव्या मनोहर रेशीम, रेणुका राजेश देशमुख, सौ शकुंतला श्रीरंग माने, सबिहा पाच कर यांच्यासह तालुक्यातील युवा सेनेचे तालुकाप्रमुख रोहिदास पप्या अंबावले व महिला आघाडी तालुकाप्रमुख प्रतिभा पवार यासह शिवसेना शिंदे गटाचे शिवसैनिक पंचायत समिती आवारात उपस्थित होते
महाड पंचायत समितीच्या सभापतीपदी निवड झालेल्या प्रेरणा सावंत यापूर्वी दाभोळ ग्रामपंचायतच्या सरपंच म्हणून त्यांनी काम पाहिले आहे त्यामुळे प्रशासनाचा त्यांना अनुभव आहे तर उपसभापती पदावर विराजमान झालेले सुरेश महाडिक यांनी तालुकाप्रमुख म्हणून त्यांची कारकीर्द गाजवली आहे प्रेरणा सावंत या दासगाव पंचायत समिती गणातून निवडून आले आहेत तर सुरेश महाडिक हे नाते पंचायत समिती गणातून निवडून आले आहेत









