नवी दिल्ली (प्रतिनिधी) : विविध मागण्यांसाठी युवक काँग्रेसतर्फे दिल्ली येथे संसद घेराव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात देशभरातून मोठ्या संख्येने युवक काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान पोलिसांनी सुरक्षा कारणास्तव अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
यामध्ये अलिबाग तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष आकाश राणे यांनाही पोलिसांनी अटक केली. संसद परिसरात आंदोलन करण्याचा प्रयत्न होत असताना पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखत त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.
केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात आणि विविध प्रलंबित प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी आपली भूमिका मांडली.
दरम्यान, आंदोलनानंतर ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सोडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
Home ताज्या बातम्या दिल्ली येथे युवक काँग्रेसचा संसद घेराव; अलिबाग तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष आकाश...






