कमळ सेवा संस्थेमार्फत कोडावर उपाय होणार!


अलिबाग (प्रतिनिधी): दि.१८ मार्च २०२६ रोजी अलिबाग शहरात कार्यरत असणाऱ्या कमळ सेवा संस्था, म्हाडा कॉलनी, श्रीबाग, या सामाजिक संस्थेमार्फत “कोड” या असाध्य समजल्या जाणाऱ्या त्वचा रोगावर उपचार करणे बाबतची चर्चा करण्यासाठी सुप्रसिद्ध त्वचारोग तज्ञ श्रीमती माया तुळपुळे पुणे यांच्या उपस्थितीत एक चर्चासत्र पार पडले. या कार्यक्रमास अलिबाग शहरातील डॉक्टर यांनी चांगला प्रतिसाद दिला.

श्रीमती माया तुळपुळे यांच्या श्वेता असोसिएट पुणे, संस्थे तर्फे संपूर्ण महाराष्ट्रात या त्वचा रोगा बद्दल प्रबोधन, मार्गदर्शन व उपचार केले जातात. त्याचाच भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन कमळ सेवा संस्थे द्वारे करण्यात आले होते. कोडावर उपचार करण्यासाठीचे आवश्यक ते प्रयत्न कमळ सेवा संस्था करणार असल्याचे या प्रसंगी जाहीर करण्यात आले. याप्रसंगी अलिबाग शहरातील सुप्रसिद्ध त्वचारोग तज्ञ डॉ. किरण नाबर, डॉ. अपूर्वा पाटील, डॉ. वाजे हे उपस्थित होते. विशेषतःकमळ सेवा संस्थेचे अध्यक्ष श्री. राजेश प्रधान, कमळ पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. नंदकुमार चाळके, कमळ पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. गिरीश तुळपुळे यांसह कमळ सेवा संस्थेचे ट्रस्टी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालक संस्थेचे उपाध्यक्ष श्री. प्रदीप नाईक यांनी केले.