चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर अंधारेंचा सूचक व्हॉट्सॲप स्टेटस चर्चेत


मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर “मोठमोठे गार केले गंमतमधी” असा सूचक संदेश पोस्ट केला आहे. त्यांच्या या स्टेटसची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली असून, तो नेमका कोणाला उद्देशून आहे, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.
चाकणकर यांच्या राजीनाम्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. अंधारे यांच्या या स्टेटसमुळे वातावरण आणखी तापले असून, विरोधकांनी यावरून सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावरही या घडामोडींवर नागरिकांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, येत्या काळात या प्रकरणावर अधिक स्पष्टता येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.