तिसरी घंटा” नाटकाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


कार्लेखिंड(प्रतिनिधी): तिसरी घंटा हा नाटक प्रेक्षकांना खूपच भावला. अलिबाग येथील पीएनपी नाट्य गृहात नुकताच तिसरी घंटा हया नाटकाचा प्रयोग झाला. या नाटकाची रहस्यमय कथा प्रेक्षकांना खरोखरच थक्क करून टाकणारी होती. एका लेखकाची ही कहानी आहे. की, त्याला नाटकातील रेखाटलेली पात्रे हुबेहूब जिवंत करणे या गोष्टीने पिछाडलेला. नाटकाचे लेखक, जयेश मेस्त्री यांनी रहस्यमय आणि भारदस्त संवाद लिहिले आहेत. तर, दिग्दर्शक म्हणून, राजन पांचाळ यांनी आपल्या अनुभवाचा उपयोग करून नाटकाला उंचीवर नेऊन ठेवले आहे. निर्माता म्हणून, कौस्तुभ भिडे यांच्या दत्त अवधूत एंटरटेनमेंट च्या बॅनरखाली तर, अनंत सांस्कृतिक कला मंच, पेझारी तर्फे सादरीकरण करण्यात आले आहे. प्रकाशमान झालेले चेहरे, धीरगंभीर संवादा वेळच्या चेहऱ्यावरील रंग छटा दाखवत मिलन पाटील यांनी कमाल केली आहे. ध्वनी आणि संगीत, विक्रांत वार्डे, वरुण भगत यांनी छानपैकी गुंफलेली आहे. यातील कलाकार, मुख्य भूमिकेतील प्रतिक पानकर, भाग्यश्री गार्डी हिने मनिषा हे पात्र सहजपणे पेलले आहे. राजन पांचाळ यांनी सायमंड हे पात्र जिवंत केले होते. हिमालय चोरगे यांने मित्र म्हणून साकारलेले पात्र अप्रतिम, शांत स्वभावाचे डाॅक्टर , सुनिल बुरुमकर, प्रमोद पाटील आणि जान्हवी माने या दोघांनी साकारलेली भूमिका अंगावर काटा उभा करणारी होती. सर्व स्थानिक कलाकारांनी अभिनयाची उंची राखून खमके कलावंत असल्याचा ठसा उमटवून रसिक प्रेक्षकांना भारावून टाकले. संगीत,अथर्व फाटक, रंगभूषा- हितेश पवार, वेशभूषा – रश्मी पांचाळ, नेपथ्य – राजा जोशी, विजय फाटक, वेदांत घाटगे, आणि सूत्रधार – देवेंद्र केळूसकर यांचे मोलाचे योगदान होते.
नाटक संपल्यावर प्रतिक्रिया म्हणून आपल्या कवितेतून विजयकुमार म्हात्रे यांनी कौतुक केले. तर सुप्रसिद्ध साहित्यिक धनावडे यांनी तिसरी घंटा हे नाटक व्यावसायिक नाटकाप्रमाणे परीपूर्ण सादर होत आहे. अशी प्रतिक्रिया व्यक्त करत नाटकाच्या सर्व टिम ला शुभेच्छा दिल्या.