अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी प्रवेश घेऊ नये राजिप शिक्षण विभागाचे आवाहन; शाळांची यादी जाहीर


रायगड (प्रतिनिधी): रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यात असणार्या 35 अनधिकृत प्राथमिक शाळांची यादी जाहीर केली आहे. पालकांनी या शाळांमध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करू नये, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ललिता दहीतुले यांनी केले आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यात असणार्या 35 अनधिकृत प्राथमिक शाळांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये श्रीवर्धन तालुक्यातील 3, म्हसळा तालुक्यातील 3, खालापूर तालुक्यातील 2, कर्जत तालुक्यातील 1, उरण तालुक्यातील 1, अलिबाग तालुक्यातील 2, महाड तालुक्यातील 1 तर पनवेल तालुक्यातील 22 शाळांचा समावेश आहे. या अनधिकृत शाळांना शिक्षण विभागाच्या वतीने आरटीइ कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ललिता दहीतुले यांनी सांगितले आहे.

अनधिकृत शाळांची यादी:
1. श्रीवर्धन – किड्स पॅरेडाईस प्रि स्कूल आराठी, इंपेरिअल स्कूल अयार मोहल्ला, अंजुमन इस्लाम जंजिरा रानवली
2. म्हसळा – अल इहसान इंग्लिश स्कूल, इतकान इंग्लिश स्कूल गोंडघर, ए.आर.उंड्रे इंग्लिश स्कूल मेंदडी
3. खालापूर – सेंट मेरी स्कूल कोपरी, भारती ॲकेडमी ॲण्ड ज्युनियर काॅलेज खोपोली
4. कर्जत – सेंट औरा ई-टेक्नो स्कूल बांधिवली
5. उरण – नागराज स्कूल बोरी
6. अलिबाग – ज्ञानार्जन प्रि प्रायमरी सेमी इंग्लिश स्कूल बोडणी, सक्सेस एज्युकेशनल ॲण्ड वेल्फेअर सोसायटी एमएसटी इंटरनॅशनल स्कूल बोडणी
7. महाड – लिटील एंजल स्कूल पानसरी मोहल्ला महाड
8. पनवेल – आशाप्रभा न्यू इंग्लिश स्कूल विचुंबे, न्यू इंग्लिश स्कूल नेरे, एसजीटी इंटरनॅशनल स्कूल करंजाडे से.4, बुद्धिष्ट इंटरनॅशनल स्कूल करंजाडे से.3, वेदिक ट्री इंटरनॅशनल स्कूल करंजाडे से.3, दि वृद्धिष्ट इंटरनॅशनल स्कूल ओवळेध् दापोली, सनराईज इंग्लिश स्कूल वावंजे, लक्ष्मण अर्जुन पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल वावंजे, साई गणेश एज्युकेशन सोसायटी नवजीवन इंटरनॅशनल स्कूल खारपाडा, सेंट ग्रेगोरियस हायस्कूल शिरढोणपाडा, ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूल कळंबोली, मार्शमेलोज इंटरनॅशनल स्कूल ओवे, काळसेकर इंग्लिश मिडीयम स्कूल पाचनंद, अर्कम इंग्लिश स्कूल तळोजा, द वेस्ट हिल इंटरनॅशनल स्कूल तळोजा, ओशियन ब्राईट काॅन्वेंट हायस्कूल तळोजा, रोहिंजण इंग्लिश स्कूल रोहिंजण, बजाज इंटरनॅशनल स्कूल तळोजा, राईजिंग इंटरनॅशनल स्कूल कोपर उलवे, एसएमबी इंटरनॅशनल स्कूल उलवे, शाहीर बाळाराम पाटील इंग्लिश स्कूल शेडुंग, लक्ष्मी पब्लिक स्कूल सांगडे.