कुरुळ येथे भव्य नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन; लाखोंची बक्षिसे जाहीर


कुरुळ (वार्ताहर) : अवघूत पाटील यांच्या पुढाकारातून कुरुळ क्रिकेट मंडळाच्या वतीने भव्य नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि. २७, २८ आणि २९ मार्च २०२६ रोजी कुरुळ येथील आझाद मैदानावर रंगणार असून परिसरातील क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या स्पर्धेसाठी प्रवेश फी १५ हजार रुपये ठेवण्यात आली असून ग्रामीण, गाव व ओपन अशा विविध गटांमध्ये सामने खेळविण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण गटात खेळलेला खेळाडू इतर गटात सहभागी होऊ शकणार नाही, असा नियम आयोजकांनी स्पष्ट केला आहे.
स्पर्धेतील विजेत्या संघाला प्रथम क्रमांकासाठी तब्बल १ लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच द्वितीय क्रमांकासाठी ८० हजार, तृतीय व चतुर्थ क्रमांकासाठी प्रत्येकी ४० हजार रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. आकर्षक चषकासह रोख पारितोषिके देण्यात येणार असल्याने स्पर्धेची रंगत अधिक वाढणार आहे.
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संघांनी पूर्ण प्रवेश फी भरल्याशिवाय नोंदणी निश्चित केली जाणार नाही, असे आयोजकांनी सांगितले आहे. अधिक माहितीसाठी स्वप्नील वाकळे, प्रशांत मोरे, जयेश पाटील, प्रसाद म्हात्रे व शुभम पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कुरुळच्या आझाद मैदानावर होणाऱ्या या भव्य नाईट क्रिकेट स्पर्धेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.