मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत फेब्रुवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यांमध्ये पुढील २ ते ३ दिवसांत थेट निधी जमा होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
राज्यातील महिलांना आर्थिक बळकटी देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली ही योजना अल्पावधीतच अत्यंत लोकप्रिय ठरली आहे. शासनाच्या या उपक्रमामुळे अनेक महिलांना आर्थिक सहाय्य मिळून त्यांच्या दैनंदिन गरजांमध्ये मोठी मदत होत आहे.
या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी देवेंद्र फडणवीस ,एकनाथ शिंद तसेच सुनेत्रा पवार यांचे मार्गदर्शन लाभत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. महायुती सरकारच्या ठोस धोरणांमुळे ही योजना अधिक प्रभावीपणे राबवली जात आहे.
दरम्यान, लाभार्थ्यांनी आपले बँक खाते आधारशी संलग्न असल्याची खात्री करून घ्यावी, तसेच कोणतीही अडचण आल्यास संबंधित विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली ही योजना आगामी काळातही अधिक जोमाने राबवली जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
Home ताज्या बातम्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : फेब्रुवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणास सुरुवात





