मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच घाबरण्याचे कारण नसल्याचे स्पष्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेजारील देशांतील सध्याच्या परिस्थितीचा भारतावर कोणताही परिणाम होणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी केंद्र सरकारने इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध करून दिला असून पुरवठा सुरळीत सुरू असल्याचे सांगितले.
ते पुढे म्हणाले की, देशातील इंधन वितरण यंत्रणा सक्षम असून कोणत्याही संभाव्य अडचणींना सामोरे जाण्यासाठी केंद्र व राज्य सरकार पूर्णपणे सज्ज आहे. नागरिकांनी अनावश्यक साठेबाजी टाळावी आणि अफवांपासून दूर राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, शेजारील देशांतील तणावपूर्ण परिस्थितीमुळे काही ठिकाणी इंधनटंचाईबाबत चर्चा सुरू असली तरी महाराष्ट्रात किंवा देशात अशा प्रकारची कोणतीही परिस्थिती उद्भवणार नाही, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला. सरकारकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Home ताज्या बातम्या शेजारील देशांतील परिस्थितीचा भारतावर परिणाम नाही; इंधन साठा मुबलक – मुख्यमंत्री देवेंद्र...





