अलिबाग (प्रतिनिधी): प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीची माध्यमिक शाळा जांबरुंग ( कर्जत ) येथील मुख्याध्यापक रमेश पिंगळे यांच्या सेवापूर्ती निमित्त संस्थेच्या वतीने शाळेत विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतः उपस्थित राहून शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमात रमेश पिंगळे सर यांनी शाळेसाठी दिलेल्या दीर्घकालीन आणि समर्पित सेवेस सर्वांनीच उच्च शब्दांत कौतुक केले. त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेने शैक्षणिक व सर्वांगीण प्रगती साधल्याचे उपस्थितांनी नमूद केले. शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनीही आपल्या भावना व्यक्त करत सरांविषयी गौरवोद्गार काढले.
या वेळी संस्थेचे ( HR ) मानव संसाधन विभागाचे विक्रांत वार्डे यांनी आपल्या भाषणात नमूद केले की, पिंगळे सरांनी तब्बल 23 वर्षे शाळा आणि संस्थेला निःस्वार्थ सेवा दिली असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक विद्यार्थी आज समाजात आपली प्रतिमा उंचावताना दिसत आहेत. सरांच्या कार्याची जाणीव कायम संस्थेला राहील, असे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी केले.
या कार्यक्रमासाठी स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण मेदगे तसेच सदस्य संदेश सावंत, कैलास बांगर, ज्योत्स्ना मेदगे ( पोलीस पाटील ), छगन कोकणे, भरत बिबवे, निलेश मेदगे, सुरेश बिबवे, जनार्दन घुडे उपस्थित होते.
या व्यतिरिक्त मा. भगत सर ( मुख्याध्यापक, रा. जि. प. शाळा जांबरुंग ), ऐनकर सर ( केंद्र शाळा जांबरुंग ), पवन मेदगे, अशोक मेदगे, राहुल वरखडे ( ग्रामस्थ ), मनिष कोकणे व भावेश थरकूडे ( माजी विद्यार्थी ) यांचीही उपस्थिती लाभली.
या वेळी संस्थेतील प्रा. निशिकांत कोळसे, प्रा. दिनेश पाटील, प्रा. तेजस म्हात्रे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती रमेश चंदू पिंगळे यांच्यासह त्यांच्या पत्नी सुवर्ण रमेश पिंगळे, मुलगा ओंकार पिंगळे आणि मुलगी अक्षदा पिंगळे हे देखील उपस्थित होते. तसेच पी एन पी माध्यमिक शाळा जांबरुंगचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून, रमेश पिंगळे सर यांच्या पुढील आयुष्यासाठी सर्वांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.





