चोंढी-अलिबाग येथे ‘श्री मंगलमुर्ती फुटवेअर’चे उद्घाटन उत्साहात


अलिबाग (प्रतिनिधी): चोंढी-अलिबाग येथे ‘श्री मंगलमुर्ती फुटवेअर’ या नव्या दुकानाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या दुकानाचे मालक निखिल चव्हाण असून, स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
या प्रसंगी काँग्रेस नेते राजाभाऊ ठाकूर यांच्या शुभहस्ते दुकानाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनावेळी परिसरातील मान्यवर, व्यापारी वर्ग तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून निखिल चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या.
‘श्री मंगलमुर्ती फुटवेअर’मध्ये विविध प्रकारचे दर्जेदार व आकर्षक पादत्राणे ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन परवडणाऱ्या किमतीत उत्तम सेवा देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून, या नव्या उपक्रमामुळे स्थानिकांना रोजगार व सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे उपस्थितांनी सांगितले.