अलिबाग श्रीवर्धन तालुक्यातील गोखले एज्युकेशन सोसायटी संचलित न्यु मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल शिस्ते बोर्ली-पंचतन मध्ये पारितोषिक समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून पी.एन.पी.एज्युकेशन सोसायटी कार्यवाह, शेकाप जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा चित्रलेखा पाटील यांना आमंत्रित केले होते. सदर कार्यक्रमासाठी न्यु मॉडर्न इंग्लिश स्कूल शिस्ते, शाळा व्यवस्थापन समिती चेअरमन, शेकाप श्रीवर्धन तालुका चिटणीस विश्वास तोडणकर, बापट सर, इंद्रकांतजी हावरे, सचिन मापुस्कर, म्हसळा तालुका चिटणीस संतोष पाटील, केंद्रप्रमुख श्याम पाटील आणि शाळा व्यवस्थापन कमिटीचे सदस्य उपस्थित होते. सदर कार्यक्रमात मुलांना शाळेय क्रिडा स्पर्धेतील बक्षिसे तसेच रंगोत्सव स्पर्धेतील बक्षिसांचे वाटप चित्रलेखा पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष चित्रलेखा पाटील यांनी आपल्या मनोगतात मुलांना नेहमी आनंदित रहा असा सल्ला दिला, विशेष म्हणजे या शाळेचे मुख्याध्यापक संतोष मुरकर सर यांच्या कामाची वाहवाह करत शाळेला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. स्वर्गीय प्रभाकर पाटील व भाई जयंत पाटील यांचा आदर्श ठेवून अलिबाग रोहा मुरुड येथे खुप सामाजिक कार्य केले आहे तसेच कार्य श्रीवर्धन तालुक्यात करण्याचा मानस आपल्या भाषणातून व्यक्त केला व पुढील काही दिवसात श्रीवर्धन – म्हसळा तालुक्यात १००० मोफत सायकल वाटप तसेच जेष्ठ व्यक्तींना चष्मा वाटप आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे संगितले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशश्री किर व सना काठेवाडी यांनी केले तर आभार प्रदर्शन दिनेश वाणी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश शिरवटकर, वैशाली लिंगायत, प्रार्थना पाटिल, दिनेश वाणी व सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी विशेष मेहनत घेतली.









