काय आहे क्षेत्रीय तपासणी (FTK) संच ?
एफ.टी.के.म्हणजे क्षेत्रीय पाणी तपासणी संच आहे. जे प्राथमिक स्वरूपात पिण्याच्या पाण्यातील रासायनिक आणि जैविक घटकांची तपासणी करण्यासाठी वापरले जाते.यामुळे पाण्याची गुणवत्ता त्वरित ठरवणे, गावपातळीवर नागरिकांना पाण्यातील अशुद्धता ओळखण्यास मदत करणे हा या संचाचा उदेश्य आहे.यामध्ये पीएच स्तर, क्लोरीन, नायट्रेट, क्लोराइड,क्लोराईड, लोह,अल्कलिनिटी,गढूळपणा, हार्डनेस,कॅल्शिअम, मॅग्नेशिअम तसेच जैविक प्रदूषणबाबत तपासणी केली जाते.याचा प्राथमिक स्तरावर लगेच निकाल मिळतो.या संचाद्वारे पाणी पुरवठा स्त्रोत, शाळा, अंगणवाडी व घरगुती नळ जोडण्याची पाणी गुणवत्ता तपासली जाणार आहे.
एफ.टी.के.संचाद्वारे पाणी गुणवत्ता तपासणी जनजागृती मोहीमेमध्ये विविध विभागांचा सहभाग राहील. त्यामध्ये ग्रामपंचायत विभाग, महिला व बालकल्याण विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, पाणी पुरवठा विभागाचा सहभाग राहिल. सर्वांच्या मदतीने व्यापक जनजागृती मोहीम यशस्वी केली जाणार आहे. नागरिकांनी या कामी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन श्रीमती भोसले यांनी केले आहॆ.









