अलिबाग समुद्रकिनाऱ्यावरील वेदर शेडच्या दुरुस्तीला वेग


नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी केली पाहणी

अलिबाग (प्रतिनिधी) : अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर नागरिक व पर्यटकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या वेदर शेडच्या दुरुस्ती व देखभाल कामाची मा. नगराध्यक्ष तथा वीज व बांधकाम सभापती प्रशांत मधुसूदन नाईक यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पाहणी केली.

समुद्रकिनाऱ्यावर वर्षभर पर्यटकांची तसेच स्थानिक नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे येथील सार्वजनिक सुविधांची नियमित देखभाल व दुरुस्ती करणे आवश्यक आहे. वेदर शेडची पाहणी करताना शेडची सद्यस्थिती, आवश्यक दुरुस्तीची कामे तसेच नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती घेण्यात आली.

दुरुस्ती व देखभाल कामे दर्जेदार पद्धतीने आणि आवश्यक त्या ठिकाणी तातडीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने पाहणी करण्यात आली. समुद्रकिनाऱ्यावरील नागरिकांच्या सुरक्षिततेसह पर्यटकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या पाहणीदरम्यान प्रशांत नाईक यांच्यासोबत संबंधित पदाधिकारी, कर्मचारी व सहकारी उपस्थित होते.