अलिबाग (प्रतिनिधी) : पोयनाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरात प्रवेश करून कपाट व बॅगेत ठेवलेली १ लाख ५ हजार रुपये रोख रक्कम चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक करून घरफोडीच्या गुन्ह्याची उकल केली आहे. ही घटना २ ऑक्टोबर २०२६ रोजी उघडकीस आली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपीचा शोध घेतला असून, त्याच्याकडून १ लाख रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोयनाड परिसरातील एका घरात अज्ञात व्यक्तीने प्रवेश करून घरातील कपाट तसेच बॅगेत ठेवलेली रोख रक्कम चोरून नेली होती. याप्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात २ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांनी उपलब्ध माहिती, तांत्रिक बाबी तसेच संशयितांच्या हालचालींच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली. त्यानंतर एका संशयित आरोपीचा माग काढून त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याचा चोरीच्या गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
अटक आरोपीकडून चोरीच्या रकमेपैकी १ लाख रुपये रोख हस्तगत करण्यात आले आहेत. उर्वरित रकमेबाबत तसेच चोरीच्या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.
या कारवाईमुळे पोयनाड परिसरातील घरफोडीच्या गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून, नागरिकांमध्ये निर्माण झालेली चिंता काही प्रमाणात दूर झाली आहे.
Home ताज्या बातम्या पोयनाडमधील घरफोडीचा गुन्हा उघडकीस; आरोपी गजाआड घरातील कपाट व बॅगेतून चोरलेली १...









