सुनीता दामोदर मोरे यांचे निधन; भंडारी समाजासह जिल्ह्यातून श्रद्धांजली


अलिबाग (प्रतिनिधी): सुनीता दामोदर मोरे (वय ८६) यांचे सोमवार, १२ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे तीन वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. भंडारी समाजाचे कार्यकर्ते संतोष मोरे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या निधनाने मोरे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, भंडारी समाजासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.सुनीता मोरे यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अंत्ययात्रेला माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, मुरूडचे नगरसेवक विजय पाटील, राजनभाई नार्वेकर, तोडणकर गुरुजी, मुरूड भंडारी समाजाचे अध्यक्ष दीपक मयेकर, निवृत्त तहसीलदार दीपक आंबुकर, रेवदंडा सरपंच प्रफुल्ल मोरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शैलेश चव्हाण, मनोहर कासेकर, सुरेश कासेकर, माजी पंचायत समिती सदस्य संतोष कनगुटकर,रायगड प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष भारत रांजणकर आदींसह रायगड जिल्ह्यातील विविध भागांतून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि भंडारी समाजाचे प्रमुख विश्वस्त तोडणकर गुरुजी यांनी श्रद्धांजली अर्पण करताना स्वर्गीय सुनीता मोरे यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

सुनीता मोरे यांचे दशक्रिया विधी बुधवारी 21 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता अलिबाग येथे होणार असून, शुक्रवारी 23 रोजी बाराव्याचा विधी होणार आहे.