पुणे | छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे १४ ते १८ जून २०२५ या कालावधीत होणाऱ्या १८ वर्षांखालील मुलींच्या युवा महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्यातील कु. तेजा सुनीता महादेव सपकाळ हिची निवड झाली आहे.
तेजा हिने रायगड संघाच्या (मुली) संघ व्यवस्थापक पदासाठी आपले स्थान निश्चित करत क्रीडा क्षेत्रात भक्कम पाऊल टाकले आहे. जिल्ह्याच्या प्रतिनिधीत्वाची संधी मिळवून तिने रायगडचा झेंडा राज्य पातळीवर फडकवला आहे.
ही निवड तेजाच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे आणि क्रीडाप्रती असलेल्या निष्ठेचे फलित आहे. तिच्या या यशाबद्दल संपूर्ण रायगड जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कु. तेजा सपकाळ हिला भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. तिच्या यशामुळे जिल्ह्यातील अनेक नवोदित खेळाडूंना प्रेरणा मिळणार आहे.