अलिबाग प्रतिनिधी :- रायगड जिल्ह्यात हवामान खात्याने पावसाचा रेड अलर्ट दिला असून जिल्ह्याच्या सर्वच भागात कमी अधिक प्रमाणात पावसाची संततधार सुरू आहे. आजच्या पावसामुळे जनजीवनावर फारसा परिणाम झाला नसला तरी पुढील तीन ते चार तासात जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 

काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शनिवारपासून बरसायला सुरुवात केली. शनिवारी रात्री दक्षिण रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. माणगाव तालुक्यातील गोरेगाव भागात ढगफुटीसदृष्य पाऊस झाल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. मात्र रविवारी रेड अलर्ट असतानाही जिल्ह्यात फारसा पाऊस झाला नाही. अधून मधून पावसाच्या मध्यम सरी कोसळत होत्या. आज सकाळ पासून आभाळ भरून आलं आहे. पावसाची संततधार सुरू आहे.
********
दरम्यान काल दिवसभरात जिल्ह्यात पाण्यात बुडून चौघांचा मृत्यू झाला. माथेरान इथं फिरायला आलेले तीन पर्यटक शारलॉट तलावात बुडाले तर खालापूर जवळ बंधाऱ्यात बुडून एकाचा मृत्यू झाला.
आज हवामान खात्याने पावसाचा रेड अलर्ट दिला असून प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

रायगड जिल्हा (तालुकानिहाय आरएफ) दि. 16.06.2025(मिमी)
सकाळी 8:00 पर्यंत
अलिबाग- 75.00
मुरुड- 88.00
पेन- 65.00
पनवेल- 49.8
उरण- 96.00
कर्जत- 74.3
खालापूर- 108.00
माथेरान- 62.00
सुधागड- 97.00
माणगाव- 104.00
तळा- 145.00
महाड- 93.00
पोलादपूर- 107.00
श्रीवर्धन- 45.00
म्हसळा- 70.00
रोहा- 65.00
एकूण पाऊस – 1344.1
आजचा सरासरी पाऊस 84.00 मिमी