नीलेश शिंदे यांनी आपल्या भाषणात आदर्श पतसंस्थेचा कारभार नावाप्रमाणेच आदर्श आहे. आदर्श ची सध्याची आर्थिक स्थिति ही भक्कम आहे. त्यामुळेच ग्राहकांचा या पतसंस्थेवर विश्वास आहे.
दत्ताजीराव मसुरकर आपल्या भाषणात म्हणाले की, सुरेश पाटील संस्थापक यांनी आदर्श पतसंस्थेची स्थापना करून ती राजकारण विरहित चालविली म्हणूनच ती मोठी झाली.
आदर्श पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी आदर्श पतसंस्थेची माहिती दिली. संस्थेचे उपाध्यक्ष कैलास जगे यांनी आभार व्यक्त केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे मुख्य अधिकारी उमेश पाटील यांनी केले . यावेळी संस्थेचे संस्थापक श्री सुरेश पाटील , अध्यक्ष श्री अभिजीत पाटील , उपाध्यक्ष श्री कैलास जगे , संचालक श्री अनंत म्हात्रे , श्री सतीश प्रधान , श्री विलाप सरतांडेल , श्री भगवान वेटकोळी , श्री रामभाऊ गोरीवले , तज्ञ संचालक श्री संजय राऊत सनदी लेखापाल , तज्ञ संचालक डॉ.श्री मकरंद आठवले , सीईओ सौ . मीनाक्षी पाटील उपस्थित होते.
आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेची १८ वी शाखा खोपोली शाखा ६ महिन्यापूर्वी एका भाड्याच्या जागेत सुरू करण्यात आली होती . सहा महिन्यात शाखेचा व्यवसाय २ कोटी इतका झाला आहे. आता ही शाखा स्वमालकीच्या जागेत स्थलांतरीत करण्यात आली आहे.





