भाजप संघटना मजबूत करणे हेच माझे प्राथमिक उद्दिष्ट – पंडित पाटील


श्रीवर्धन रायगड:माजी आमदार पंडित पाटील यांच्या भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर श्रीवर्धनच्या कार्यकर्त्यांमध्येही नवचैतन्य संचारले आहे. पाटील यांच्या श्रीवर्धन येथील निवासस्थानी पक्षाच्या विविध पातळीवरील कार्यकत्यांनी सदिच्छा भेट घेतली आणि पुष्पगुच्छ देत त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले.
या भेटीदरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पंडित पाटील यांनी म्हणाले की, पक्षवाढीसाठी मी कटिबद्ध आहे. स्थानिक कार्यकत्यांचे प्रश्न, अपेक्षा आणि गरजा समजून घेत त्यावर काम करणार आहे. कार्यकर्त्यांच्या बळावर संघटना मजबूत करणे हेच माझे प्राथमिक उद्दिष्ट आहे.
या भेटीवेळी भाजप शहर अध्यक्ष लक्ष्मण पावशे, महिला मोर्चा शहर अध्यक्ष सुप्रिया चोगले, रविना गुरव, माजी नगरसेवक वसंत यादव, रमेश चोगले, गितेश मयेकर, उदेश करदेकर, मकरंदर पोलेकर, रोशन बोरकर, रवींद्र चौलकर, वीरेंद्र पोलेकर परेश पोलेकर सहभागी झाले होते.पक्षाच्या आगामी वाटचालीसाठी ही भेट अत्यंत सकारात्मक ठरली असून कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला पाठिंबा आणि पंडित पाटील यांचा अनुभव यामुळे श्रीवर्धनमधील भाजप संघटना अधिक मजबूत होईल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.