अभिनेत्री अर्चना पाटील यांना निळू फुले स्मृती गौरव पुरस्काराने सन्मान


 अलिबाग (प्रतिनिधी): पेण तालुक्यातील शिर्की गावच्या सुपुत्री आणि मराठी सिने, मालिका व नाट्यक्षेत्रात आपल्या अभिनयाने विशेष ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री अर्चना पाटील यांना पुणे येथे निळू फुले स्मृती गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विश्वकर्मा प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व आकर्षक स्मृतीचिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात आले.
अर्चना पाटील यांनी स्टार प्रवाहवरील लक्ष, फुलाला सुगंध मातीचा, तुझे मी गीत गात आहे, आई कुठे काय करते यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्याशिवाय तू चाल पुढं, नवा गडी नवा राज्य, सण मराठी, पिंगा ग पोरी पिंगा, निवेदिता माझी ताई, जन्मोजन्मी मी आदिशक्ती आदी मालिकांमध्येही त्यांनी दमदार अभिनय सादर केला आहे.
नाटक आणि मराठी चित्रपट डिलिव्हरी बॉय मध्ये देखील त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारली आहे. त्यांना पेण फेस्टिव्हल बेस्ट स्माईल पुरस्कार, राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार, अहिल्याबाई होळकर पुरस्कार आदी सन्मान प्राप्त झाले आहेत.
याशिवाय शंभू मेरा, बाप्पा यो, नाद खुळा, माझा बाप्पा घरी येतो या गाण्यांच्या अल्बम्समध्ये त्यांच्या अभिनय कौशल्याने रसिकांचे मन जिंकले आहे. अर्चना पाटील यांच्या यशस्वी वाटचालीला सलाम!
My Work In Serial 
 १) लक्ष ( स्टार प्रवाह) कामवाली
२) अग बाई सासू बाई ( झी मराठी) गेस्ट
३) बाळू मामाच्या नावानं चांगभल ( कलर्स मराठी) गावकरी
४) सोन्याची पावले (कलर्स मराठी )शेजारी
५) लेक माझी दुर्गा (कलर्स मराठी )मुलीची आई
६) श्री स्वामी समर्थ (कलर्स मराठी) गावकरी
७) येऊ कशी कशी मी नांदायला (झी मराठी )नर्स
८) माझी तुझी रेशन कार्ड (झी मराठी )शेजारी
९) सहकुटुंब सहपरिवार (स्टार प्रवाह) जोगतीन, नर्स
१०) फुलाला सुगंध मातीचा स्टार प्रवाह नर्स
११) तुमची मुलगी काय करते सोनी मराठी शेजारी
१२) तू चाल पुढे झी मराठी लग्न घरातील गेस्ट
१३) तुझेच मी गीत गात आहे स्टार प्रवाह नर्स
१४) कन्यादान सन मराठी डॉक्टर
१५) मी तुला न पाहिले झी मराठी शेजारी
१६) मन धागा धागा जोडते नवा स्टार प्रवाह गोंडे वाली
१७) नवा गडी नव राज्य झी मराठी नर्स
१८) ही लग्नाची बिडी स्टार प्रवाह आश्रमातील बाई
१९) मुरंबा स्टार प्रवाह ड्रायव्हरची बायको
२०) काव्यांजली कलर्स मराठी मैत्रीण
२१) माझी माणसं मराठी डॉक्टर
२२) कुण्या राजाची तू ग राणी स्टार प्रवाह डॉक्टर
२३) प्रेमाची गोष्ट स्टार प्रवाह सावनी ची फ्रेंड
२४) तुला शिकवीन चांगलाच धडा झी मराठी जोगवा
२५) मुलगी पसंत आहे सन मराठी कैदी
२६) तुझी माझी जमली जोडी सण मराठी लग्न घरातील गेस्ट
२७) शिवा झी मराठी मुलाची आई
२८) अबोली स्टार प्रवाह शेजारी
२९) सातव्या मुलीची सातवी मुलगी झी मराठी डॉक्टर
३०) छोट्या बाईची मोठी स्वप्न मराठी बायको
३१) निवेदिता माझी ताई सोनी मराठी आश्रमातील कर्मचारी
३२) अटल &Tv हिंदी सिरियल पडोसन
३३) सफल होगी तेरी आराधना Dangal channel गाव वाली
३४) भूमिकांना सोनी मराठी भाजीवाली
३५) साधी माणसं स्टार प्रवाह मॅनेजर ची बायको
३६) आई कुठे काय करते स्टार प्रवाह ऑफिसर
३७) नवी जन्मेन मी सण मराठी बायको
३८) आदिशक्ती सन मराठी कांता कंटिन्यू कॅरेक्टर
३९) पिंगा ग पोरी पिंगा कलर्स मराठी कॉन्स्टेबल
४०) लग्नानंतर होईलच प्रेम स्टार प्रवाह नर्स
४१) प्रेमात रंग यावे सन मराठी शेजारी
४२) उदे ग अंबे उदे स्टार प्रवाह नवरा-बायको जोडपे
My song 
 शंभू मेरा (द्रवेश पाटील )
बाप्पा यो पाहुणा आला (अक्षय पाटील )
केळंबा देवी (लाभेश पाटील)
आई बाबा (सचिन कांबळे )
नाद खुळा (प्रशांत नाटके)
गुलाल उरवीन (लाभेश पाटील)
माझा बाप्पा (मुंबई प्रोडक्शन )
तिरंगा
घरी येतो बाप्पा (भालचंद्र प्रोडक्शन )
गुलाल उडतय गुलाब (लाभेश पाटील )
मावळा मी शिवरायांचा( प्रशांत म्हात्रे )
पुणेरी पाहुणा
मनिये बावरा (तनुजा मेहता)
My award
पेण फेस्टिवल 2018 बेस्ट स्माईल अवॉर्ड
अलिबाग मिसेस सौंदर्य सम्राज्ञी 2018 विनर
राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार 2020
द्रोणागिरी भूषण पुरस्कार पुरण 2022
अहिल्याबाई होळकर पुरस्कार शिर्की ग्रामपंचायत 2023