भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत संघटना बळकटीवर भर


मुंबई (धनश्री रेवडेकर) : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आज महिला मोर्चा जिल्हाध्यक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत संघटनेच्या बळकटीकरणासंदर्भात सखोल चर्चा झाली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिला मोर्चाची तयारी, कार्यपद्धती आणि नेतृत्व विकासावर भर देण्यात आला.
बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्रजी चव्हाण, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा सौ. चित्राताई वाघ, प्रदेश सरचिटणीस आमदार विक्रांतदादा पाटील, प्रदेश महामंत्री सौ. माधवीताई नाईक, महामंत्री संजयजी केणेकर व कार्यालय प्रमुख रवीजी अनासपुरे यांची विशेष उपस्थिती लाभली.
या बैठकीत पक्षाच्या विचारधारेनुसार महिलांच्या नेतृत्व क्षमतेला चालना देणे, जिल्हास्तरावर संघटनात्मक कार्यपद्धती अधिक प्रभावी करणे आणि कार्यकर्त्यांचे सशक्त जाळे उभे करणे यावर भर देण्यात आला. महिला मोर्चा हे पक्षाचे अत्यंत प्रभावी अंग असून, प्रत्येक जिल्ह्यातील महिला कार्यकर्त्यांनी सामाजिक व राजकीय कामात पुढाकार घ्यावा, असे आवाहन नेत्यांनी यावेळी केले.
महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मैदानात उतरून महिलांमध्ये पक्षाची विचारसरणी पोहोचवावी, तसेच आगामी निवडणुकांसाठी तयारी सुरू करावी, असे आवाहन करण्यात आले. प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. ही बैठक महिला मोर्चाच्या संघटनात्मक बळकटीकरणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली.