रायगड (प्रतिनिधी): माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या “श्रीमती गीता दत्तात्रय तटकरे कॉलेज ऑफ नर्सिंग” या संस्थेच्या नामकरण व उद्घाटन सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री. अजितदादा पवार आणि खासदार व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय श्री. सुनील तटकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

उद्घाटन प्रसंगी अजितदादा पवार यांनी आपल्या भाषणात रायगड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य, शिक्षण, उद्योग व रोजगार या महत्त्वाच्या क्षेत्रांतील सुरू असलेले उपक्रम आणि योजनांवर प्रकाश टाकला. “महायुती सरकारच्या प्रयत्नांमुळे रायगड जिल्ह्याचा विकास अधिक वेगाने होईल, आणि ही प्रगती अखंड सुरू राहील,” असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

या सोहळ्याला माजी आमदार अनिकेत तटकरे, श्री. राजीव साबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, भास्करदाजी विचारे, शर्मिला सुर्वे, मेहरोश जांगे यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा उद्घाटन सोहळा माणगाव परिसरासाठी शिक्षण व आरोग्य क्षेत्रात नवा अध्याय सुरू करणारा ठरला.