मुंबई (धनश्री रेवडेकर): महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने वर्ष २०२५ या वर्षातील गोकुळाष्टमी (दहीहंडी) व अनंत चतुर्दशी यासाठी स्थानिक सुट्ट्यांची घोषणा केली आहे. या सुट्ट्या विशेषतः मुंबई शहर व उपनगरांतील राज्य शासकीय/निमशासकीय कार्यालयांकरिता लागू असणार आहेत.
शासन निर्णयानुसार खालीलप्रमाणे स्थानिक सुट्ट्या घोषित करण्यात आल्या आहेत :
गोकुळाष्टमी (दहीहंडी) –
तारीख : १६ ऑगस्ट २०२५ (शनिवार)
भारतीय सौर दिनांक : २४ श्रावण शके १९४७
अनंत चतुर्दशी –
तारीख : ३० ऑगस्ट २०२५ (शनिवार)
भारतीय सौर दिनांक : ०७ भाद्रपद शके १९४७
तसेच, नरळी पोर्णिमा व गणेश विसर्जन यासाठी यापूर्वीच स्थानिक सुट्ट्या घोषित करण्यात आल्या आहेत :
नारळी पोर्णिमा – ८ ऑगस्ट २०२५ (शुक्रवार)
गणेश विसर्जन – २ सप्टेंबर २०२५ (मंगळवार)
या निर्णयामुळे मुंबईतील अनेक कार्यालयांना सुट्टीचा लाभ मिळणार असून, संबंधित कार्यालयांनी याची नोंद घ्यावी, असे सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट केले आहे.