पीएनपीत आंतरराष्ट्रीय युवा दिना निमित्त विधी साक्षरता शिबिर


अलिबाग ( प्रतिनिधी ): जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड – अलिबाग व पीएनपी कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय युवा दिना निमित्त विधी साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाकरिता प्रमुख वक्त्या अॅड. निलोफर शेख उपस्थित होत्या त्यांनी विद्यार्थ्यांना Anti-Ragging Laws, Traffic Rules या संदर्भात सविस्तर माहिती दिली तर अॅड. तन्मय म्हात्रे यांनी World Tribal Day, NALSA/MALSA मध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध स्कीम बद्दल सविस्तर माहिती दिली श्रीमती तेजस्विनी निराळे ( वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग ) यांनी विद्यार्थ्यांना त्यांचे हक्क तसेच जिल्हा विधी प्राधिकरण यांच्या कडून उपलब्ध असणाऱ्या विविध सुविधा तसेच समाजामध्ये युवा वर्गाचे योगदान याच्यावर प्रामुख्याने प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयाचे संचालक विक्रांत वार्डे, प्राचार्य रविंद्र पाटील, उपप्राचार्य निशिकांत कोळसे कार्यक्रमास उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्र संचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी दिनेश पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख गणेश पाटील यांनी केले आणि कार्यक्रमाचे नियोजन क्रीडा विभाग प्रमुख तेजेश म्हात्रे यांनी केले.