अलिबाग (प्रतिनिधी): राजकीय , सामाजिक व सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे अलिबागचे माजी नगरसेवक ॲड .सागर रामकृष्ण पाटील यांचे काल सकाळी निधन झाले असून अंत्यविधी रामनाथ स्मशानभूमीत सकाळी १०:३०वाजता करण्यात आले. गेली अनेक वर्षे ते काँग्रेस पक्षाचे काम करीत होते. अलिबाग मधील एका पतसंस्थेचे ते चेअरमन होते. गेली काही महिन्यांपासून त्यांच्या आजारपणावर उपचार सुरू होते. अखेर सोमवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.









