अलिबाग (प्रतिनिधी):तालुक्यातील वाडगाव येथे तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत अलिबाग तालुक्यातील १४ वर्षाखालील मुले-मुली, १७ वर्षाखालील मुले-मुली आणि १९ वर्षाखालील मुलामुलींना सहभाग नोंदविला होता. फ्री-स्टाईल आणि ग्रीको रोमन कुस्ती प्रकारातील स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धांचे उदघाटन राष्ट्रवादीचे नेते ऍड. प्रवीण ठाकूर , वाडगाव उपसरपंच तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुका अध्यक्ष जयेंद्र भगत, प्रमोद भगत ,रमेश भगत, माजी सरपंच सिताराम भगत,माजी सरपंच सरिता भगत, सदस्य रूपाली पाटील,माजी उपसरपंच नरेश थळे, नरेश कडू ,पोलीस पाटील नथुराम म्हात्रे, गणपत पवार, मधुकर थळे, सर्व क्रीडा शिक्षक
पंच वैभव मुकादम, सुधाकर पाटील, कुलदीप पाटील, सौरम पाटील, यतिराज पाटील, प्रवीण भगत, नितीन पाटील अदी मान्यवर उपस्थित होते.