स्वाती सिनकर यांचे निधन


अलिबाग : अलिबाग तालुक्यातील रामराज गावच्या रहिवासी स्वाती सिनकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ५६ वर्षांच्या होत्या. त्यांच्या अचानक निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शेतकरी कामगार पक्षाचे अलिबाग पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष वागळे यांच्या त्या छोट्या भगिनी होत. त्यांच्यावर रामराज येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्वाती सिनकर यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या पश्चात त्यांचे पती संदीप सिनकर, मुलगा सुश्रुत सिनकर आणि मुलगी सई सिनकर आणि सिनकर आप्तेष्ट असा मोठा परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी सोमवारी ( दि .1) तर उत्तर कार्य गुरुवारी (दि. 4) रामराज येथील राहत्या घरी होणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.