अलिबाग (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अलिबाग-मुरुड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अमित दादा नाईक यांनी अलिबाग तालुक्यातील साखरचैथ येथील गणपती बाप्पाचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावातील गणेशमूर्तीचे दर्शन घेऊन त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी लोकांच्या सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी गणपती बाप्पाकडे प्रार्थना केली. तसेच विकासकामे व जनहितासाठी कटिबद्ध राहण्याचा विश्वास व्यक्त केला. गावकऱ्यांनी उत्साहाने त्यांचे स्वागत केले. गणेशोत्सव हा एकात्मतेचा आणि भक्तीचा पर्व असून, यावेळी लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
नाईक यांनी गणपतीच्या चरणी नतमस्तक होऊन समाजासाठी सेवा करत राहण्याचा संकल्प केला. या भेटीत पक्षाचे कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने लोककल्याणाची भावना अधिक बळकट झाली.









