अलिबागमध्ये शांततेत मतदान; ज्येष्ठ नागरिकांचे मतदान केंद्रावर स्वागत


अलिबाग(प्रतिनिधी):अलिबागमध्ये आज मतदान प्रक्रिया अत्यंत शांततेत आणि नियोजनबद्ध रितीने सुरू आहे. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांची चांगली गर्दी दिसत असून विशेषतः ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह उल्लेखनीय आहे. प्रशासन आणि निवडणूक अधिकारी यांनी मतदान केंद्रांवरील व्यवस्था सुस्थितीत ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत.

ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष मार्गदर्शन, बसण्याची सोय, मदतनीस कर्मचारी तसेच व्हीलचेअर सारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे वयोवृद्ध मतदारांना मतदानासाठी कोणतीही अडचण भासू नये याची काळजी घेतली जात आहे.

शिस्तबद्ध रांगा, सुरक्षारक्षकांची दक्षता आणि स्वयंसेवकांचे सहकार्य यामुळे मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पुढे जात आहे. मतदारांमध्ये लोकशाही मूल्यांबद्दल मोठा उत्साह पाहायला मिळत असून संपूर्ण दिवस मतदान समाधानकारकरीत्या पार पडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.