अलिबाग (प्रतिनिधी): श्रीगाव गावातील अंतर्गत शिवबा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन शुक्रवार, दिनांक १९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आले आहे. गेले कित्येक वर्षे रखडलेले हे रस्त्याचे काम अखेर मार्गी लागत असून, त्यामुळे ग्रामस्थांची मोठी अडचण दूर होणार आहे.
हा भूमिपूजन सोहळा मा. श्री. महेंद्रशेट दळवी (दमदार आमदार, अलिबाग–मुरुड विधानसभा), मा. श्री. राजाभाई केणी (शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख) तसेच सौ. रसिकाताई राजाभाई केणी (उपसरपंच) यांच्या सौजन्याने संपन्न होत आहे.
या रस्त्याच्या कामामुळे शिवबा मंदिर परिसरासह संपूर्ण परिसरातील वाहतूक सुलभ होणार असून, पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या समस्यांनाही कायमस्वरूपी दिलासा मिळणार आहे.
या महत्वपूर्ण कार्यक्रमास सर्व ग्रामस्थांनी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन निमंत्रक शिवसेना शाखा व ग्रामस्थ मंडळ, श्रीगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.









