रुईशेत–भोमोली हद्दीतील रस्त्यांच्या डांबरीकरण कामाचा भव्य भूमिपूजन सोहळा


अलिबाग (प्रतिनिधी): रुईशेत–भोमोली हद्दीतील अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरण कामाचा भव्य भूमिपूजन सोहळा मंगळवार, दि. ०६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ठीक १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या विकासकामाचे उद्घाटन मा. श्री. राजाभाई केणी (शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख) तसेच मा. सौ. रसिकाताई राजाभाई केणी (उपसरपंच, ग्रुप ग्रामपंचायत कुसुंबळे) यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
या रस्त्यांच्या कामामुळे परिसरातील दळणवळण अधिक सुलभ होणार असून नागरिकांना सुरक्षित व सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या या मागणीला अखेर मंजुरी मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. विकासाभिमुख दृष्टीकोनातून रस्ते पायाभूत सुविधांचे महत्त्व लक्षात घेऊन हे काम हाती घेण्यात आले आहे.
या भूमिपूजन सोहळ्यास सर्व ग्रामस्थांनी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना शाखा व ग्रामस्थ मंडळ रुईशेत–भोमोली यांच्या वतीने करण्यात आले आहे.