अलिबागमध्ये भाजपला मोठे खिंडार; कुसुंबळेतील माजी सरपंचांसह असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश


अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग–मुरुड विधानसभा मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला असून कुसुंबळे ग्रामपंचायतीतील भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी जाहीरपणे शिवसेना (शिंदे गट) मध्ये उद्या रविवार प्रवेश होणार राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. या पक्षप्रवेशामुळे परिसरात भाजपला मोठे खिंडार पडले असून शिवसेनेची ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे.
कुसुंबळे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच तसेच भाजपच्या धडाडीच्या नेत्या सौ. प्रतीक्षा महेश पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य बजरंग लक्ष्मण पाटील, भाजपचे स्थानिक नेते महेश पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती धरला. यामध्ये विद्याधर पाटील, सुशील पाटील, विनायक पाटील, सचिन पाटील, गणेश पाटील, गजानन पाटील, सुनील पाटील, सुशांत पाटील, धन्यता पाटील, प्रतिभा पाटील, मालती पाटील, आशा पाटील, नाजूका पाटील, सुजाता पाटील, सुनीता पाटील आणि भूमिका पाटील यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात सुरू असलेल्या विकासकामांचा झंझावात तसेच जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांचे प्रभावी संघटन कौशल्य पाहून शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले. “शब्दाला जागणारा नेता” अशी आमदार दळवी यांची ओळख असून त्यांच्या दूरदृष्टीमुळे अलिबाग–मुरुड मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होत असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

तसेच जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांनी प्रेमळ स्वभाव, कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन काम करण्याची पद्धत आणि संघटन वाढविण्याच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यात शिवसेनेला नवी उर्जा दिली असल्याचे मत नव्याने प्रवेश केलेल्या सदस्यांनी व्यक्त केले. या सक्षम नेतृत्वाखाली विभागाचा विकास निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हा पक्षप्रवेश सोहळा आमदार महेंद्रशेठ दळवी, जिल्हा प्रमुख राजाभाई केणी तसेच आंबेपूर मतदारसंघाच्या उमेदवार रसिका केणी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी मान्यवरांनी नव्या सदस्यांचे पक्षात स्वागत करून त्यांच्या भावी सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या मोठ्या पक्षप्रवेशामुळे कुसुंबळे व परिसरात भाजपची पकड सैल झाली असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) चे पारडे जड होत असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.