रायगड (प्रतिनिधी): मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच अभियानाचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील ग्रामपंचायती, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्रे याठिकाणी शुक्रवारी ता.16 सामुहिक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या अभियानात अधिकारी, कर्मचा-यांसह ग्रामस्थ, विद्याथ्र्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी 7 हजार 998 किलो प्लास्टिक व सुका कचरा गोळा करण्यात आला.
स्वच्छता हा मानवी आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्या घरासह आपल्या आजूबाजूचा परिसरही जर स्वच्छ राहिला तर रोगराईला आळा बसणार आहे. त्यामुळे स्वच्छतेचे महत्त्व लक्षात घेउन समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत सामुहिक स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील प्लास्टिक व सुका कचरा गोळा करण्यात आला. जमा कच-याचे योग्य व्यवस्थापन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायती, शाळा, आरोग्य केंद्र, अंगणवाडी, उपकेंद्र असे मिळून एकूण 20 हजार 281 अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, ग्रामस्थांनी हे स्वच्छता अभियान राबविले. यातून 7 हजार 998 किलो कचरा गोळा करण्यात आला असून त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे व स्वच्छता व पाणीपुरवठा विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले यांनी माणगाव तालुक्यातील वरचीवाडी व तळाशेत येथे स्वच्छता अभियानात सहभाग घेत ग्रामस्थांचा उत्साह वाढविला. श्रीवर्धन तालुक्यातील रानवली ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद शाळेच्या विद्याथ्र्यांनी पथनाट्य सादर करून स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.
तालुका सहभागी शाळा संकलित कचरा किलोमध्ये
1. अलिबाग 165 42
2. कर्जत 271 117
3. खालापूर 166 88
4. महाड 285 111
5. माणगाव 257 102
6. म्हसळा 89 72
7. मुरूड 83 11
8. पनवेल 246 206
9. पेण 214 383
10. पोलादपूर 113 46
11. रोहा 211 58
12. श्रीवर्धन 86 110
13. सुधागड 147 101
14. तळा 84 40
15. उरण 56 52
एकूण सहभागी जिल्हा परिषद शाळा: 2473 एकूण संकलित कचरा: 2012 किलो
तालुका सहभागी ग्रामपंचायती संकलित कचरा किलोमध्ये
1. अलिबाग 62 381
2. कर्जत 54 165
3. खालापूर 44 44
4. महाड 134 246
5. माणगाव 74 256
6. म्हसळा 39 69
7. मुरूड 24 25
8. पनवेल 71 73
9. पेण 65 238
10. पोलादपूर 42 40.3
11. रोहा 64 75
12. श्रीवर्धन 43 770
13. सुधागड 33 82
14. तळा 25 44
15. उरण 35 761
एकूण सहभागी ग्रामपंचायती: 809 एकूण संकलित कचरा: 3269 किलो
तालुका सहभागी अंगवाडी संकलित कचरा किलोमध्ये
1. अलिबाग 278 27
2. कर्जत 338 70
3. खालापूर 204 44
4. महाड 320 106
5. माणगाव 320 79
6. तळा 96 28
7. म्हसळा 108 14
8. मुरूड 113 6
9. पनवेल 272 223
10. पेण 309 274
11. रोहा 258 48
12. पोलादपूर 118 28
13. श्रीवर्धन 134 45
14. सुधागड 170 67
15. उरण 123 523
एकूण सहभागी अंगणवाडी: 3161 एकूण संकलित कचरा: 1580 किलो
तालुका सहभागी प्रा. आरोग्य केंद्र व उपकेंद्र संकलित कचरा किलोमध्ये
1. अलिबाग 37 139
2. कर्जत 44 140
3. खालापूर 22 22
4. महाड 33 34
5. माणगाव 34 82
6. म्हसळा 13 24
7. मुरूड 24 16
8. पनवेल 29 17
9. पेण 33 101
10. पोलादूपर 10 4
11. रोहा 25 16
12. श्रीवर्धन 9 10
13. सुधागड 16 1
14. तळा 8 7
15. उरण 9 105
एकूण सहभागी प्रा. आरोग्य केंद्र व उपकेंद्र: 336 एकूण संकलित कचरा: 717 किलो









