अलिबाग बंदरावर मासळी उतरविण्यावरून वाद


साखर-आक्षीतील मासळी उतरते अलिबाग बंदरावर कायदेशीर कारवाई करा – अलिबागच्या मच्छीमार बांधवाची सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांकडे मागणी

अलिबाग रायगड:अलिबाग बंदरावर दुसऱ्या गावांतील मच्छीमार आपली मच्छी उतरवित असल्याने अलिबाग बंदरावरील मच्छीमारांना मच्छी उतरविण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. यामुले बंदरावर होत आहेत. अलिबाग बंदरावर लावण्यात येणाऱ्या बाहेर गावच्या नौकांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी अलिबाग बंदर येथील मच्छीमार बांधवांनी केली आहे.
अलिबाग बंदरावर साखर गावाच्या मासेमारी नौका मासे उतरवण्यासाठी व मासळी विक्रीसाठी येत असतात. अलिबाग येथील मच्छीमार संस्थेच्या नौकाधारक एकूण 300 ते 350 नौका असून त्या नौका अलिबाग बंदरावर मासे उतरवण्यासाठी व विक्रीसाठी रोज येत असतात. त्यामुळे अलिबाग जेट्टी ही 300 ते 350 नौकांच्या मासळी उतरवण्याच्या क्षमतेपेक्षा कमी आहे. साखर या गावाच्या 20 ते 25 नौका मासे उतरवण्यासाठी येतात त्यामुळे अलिबाग संस्थेच्या नौकांना मासे उतरवण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही, त्यामुळे अलिबागचे नौकाधारक व बाहेरच्या गावच्या नौका धारकांमध्ये जेट्टीवर मासळी उतरवण्यावरून वाद विवाद होत असतात.
साखर गावामध्ये मासळी उतरवण्यासाठी साखर आक्षी हे बंदर असून ते त्या बंदरावर मासे उतरवण्यासाठी व विक्रीसाठी तेथे नौका लावण्यात याव्यात. साखर गावामध्ये बंदर असून सुद्धा ते अलिबाग बंदरावर मासळी उतरवण्यासाठी व विक्रीसाठी नौका घेऊन येतात त्यामुळे नेहमी वाद विवाद होत असतात. त्यांना नेहमी वारंवार सांगून सुद्धा जाणूनबुजून अलिबाग बंदरावर बोटी लावल्या जातात.
त्यामुळे अलिबाग बंदरावर लावण्यात येणाऱ्या बाहेर गावच्या नौकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, 1981 अंतर्गत कलम 10 (1) च्यानुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी अलिबाग बंदर येथील मच्छीमार बांधवांनी रायगडच्या मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त यांना निवेदन देऊन केली आहे.