अलिबाग (प्रतिनिधी): राजाभाऊ ठाकूर यांची प्रचारात आघाडी चोंढी येथील मंदिरात नारळ फोडून प्रचाराला सुरुवात महाविकास आघाडीच्या प्रचारफेरीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आवास जिल्हा परिषद निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ ठाकूर यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. मंगळवारी चोंढी येथील हनुमान मंदिरात नारळ फोडून प्रचाराची अधिकृत सुरुवात करण्यात आली. यावेळी फटाक्यांची आतषबाजी व जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यानंतर चोंढी परिसरात भव्य प्रचारफेरी काढण्यात आली. महाविकास आघाडीलाच मतदान करण्याचे आवाहन मतदारांना करण्यात आले. या प्रचारफेरीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. घरोघरी उमेदवारांचे स्वागत करण्यात आले, औक्षण करून शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी उमेदवार राजाभाऊ ठाकूर यांनी स्वतःसह पंचायत समितीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला.

या प्रसंगी शेकापचे शंकर म्हात्रे, शिवसेनेचे सुबोध राऊत, धनंजय गुरव, पंचायत समितीच्या उमेदवार अनिता शिंदे, काँग्रेस नेते सुनील थळे, रविंद्र ठाकूर, रविना ठाकूर, प्राची ठाकूर यांच्यासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









