अलिबाग (प्रतिनिधी): कुर्डूस ग्रामपंचायत हद्दीतील भोमोली गावात शिवसेनेचा झंझावात पाहायला मिळत असून मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे कुर्डूस ग्रामपंचायतमध्ये भाजपाला मोठा धक्का बसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. भोमोली येथील ग्रामस्थांनी परिवर्तन, विकास आणि लोकशाहीच्या मूल्यांच्या बाजूने ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेत शिवसेनेवर आपला विश्वास व्यक्त केला आहे.
शिवसेना ही नेहमीच जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढणारी संघटना असून ‘जनतेसोबत, जनतेसाठी’ ही भूमिका सातत्याने बजावत आहे. याच कार्यपद्धतीमुळे शिवसेनेची ताकद दिवसेंदिवस वाढत असून सामान्य जनतेचा आवाज अधिक बुलंद होत आहे.
स्थानिक पातळीवर विकासकामांना गती देणे, नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करणे आणि पारदर्शक कारभार ही शिवसेनेची ओळख बनली आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांच्या प्रभावी कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत त्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. राजाभाई केणी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना अधिक मजबूत होत असून ग्रामीण भागात पक्षाचा जनाधार लक्षणीयरीत्या वाढत आहे. या पक्षप्रवेशामुळे आगामी काळात कुर्डूस ग्रामपंचायत परिसरातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
Home ताज्या बातम्या शिवसेना वाढतेय… विश्वास जिंकतेय! कुर्डूस ग्रामपंचायत हद्दीत भोमोली ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश









