रायगड जिल्ह्यातील मतमोजणी केंद्रांची यादी जाहीर


अलिबाग (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने मतमोजणी केंद्रांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. शांततापूर्ण, पारदर्शक व सुरळीत मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रत्येक तालुकानिहाय स्वतंत्र केंद्र निश्चित करण्यात आले असून आवश्यक त्या सर्व प्रशासकीय व सुरक्षा व्यवस्था करण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील मतमोजणी केंद्रे पुढीलप्रमाणे आहेत— कर्जत येथे प्रशासकीय भवन, पहिला मजला, तहसील कार्यालय; पनवेल येथे व्ही. के. हायस्कूल; खालापूर येथे पंचायत समिती सभागृह; सुधागड येथे तहसील कार्यालयातील हिरकणी कक्ष; पेण तालुक्यासाठी लिटल एंजल स्कूल; उरण तालुक्यासाठी प्रकल्पग्रस्त सिडको प्रशिक्षण केंद्र, सेक्टर ३०, बोकडविरा; अलिबाग येथे जिल्हा क्रीडा संकुल, नेहूली; मुरुड येथे दरबार हॉल; रोहा येथे ज्येष्ठ नागरिक सभागृह; तळा येथे पंचायत समितीतील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी हॉल; माणगाव येथे तहसील कार्यालयातील प्रशासकीय भवन, पहिला मजला; म्हसळा येथे न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज; श्रीवर्धन येथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील मीटिंग हॉल; महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकातील बहुउद्देशीय हॉल; तसेच पोलादपूर येथे तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे.
मतमोजणीच्या दिवशी अधिकृत प्रतिनिधी, कर्मचारी व माध्यम प्रतिनिधींनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.