महाड(रेश्मा माने): स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तिसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मतदानाला तीन दिवसाचा अवधी शिल्लक असतानाच महाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार पडले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षांशह माजी उपनगराध्यक्ष व माजी नगराध्यक्ष यांच्यासहित अनेक दिग्गज ज्यांनी शिवसेना शिंदे गटात राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पायाखालची वाळू घसरल्याचे बोलले जात आहे
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानाला अवघे तीन दिवस शिल्लक असताना आज महाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा दणका बसला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष राकेश शहा यांच्यासह, माजी उपनगराध्यक्ष रमेश काका वैष्णव, माजी नगराध्यक्ष मोहम्मद अली पल्लवकर, केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मोहन काका शेठ, बुटाला हॉलचे व दशा नेमा गुजराती समाजाचे अध्यक्ष प्रमोद पारेख, ज्येष्ठ उद्योजक बाळू जोशी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला सरचिटणीस हर्षाली शिर्के, महाड शहराच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला उपाध्यक्ष अर्चना सावंत, अण्णासाहेब सावंत बँकेचे संचालक समीर भाई मेहता, अण्णासाहेब सावंत बँकेचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंट चे संदीप शेठ, भोई समाज महाड शहराध्यक्ष उदय फुटाणकर, माजी नगरसेविका शितल रमेश यादव, चांभार खिंड चे माजी सरपंच शशिकांत पालकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी युवा शहराध्यक्ष चैतन्य श्रीकांत मुंदडा, यांच्यासह रमेश अनंत यादव, दत्ताराम अनंत यादव, सुबोध यादव, समीर जोशी ,रोहन शेठ, जयेश गांधी, दाजी जगदाळे, जयप्रसाद प्रकाश जोशी, पंकज मेहता. असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे
महाड शहरामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणावर गटबाजी झाली होती खरे तर त्याच वेळेला आज प्रवेश केलेल्यांचा शिंदे गटात प्रवेश होणार होता मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तटकरे गटाकडून मोठ्या प्रमाणावर राजकीय दबाव आल्याने प्रवेश थांबला होता मात्र आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा दणका बसला असून यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे









