अलिबाग आगारातील पोलिस चौकीचे उद्घाटन; यशोधन पतसंस्थेकडून नूतनीकरण, मा.आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण


अलिबाग (प्रतिनिधी) : अलिबाग आगार परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या पोलिस चौकीचे उद्घाटन शनिवारी सकाळी उत्साहात पार पडले. या चौकीचे नूतनीकरण व उभारणीचे काम यशोधन पतसंस्था, अलिबाग, रायगड यांच्या माध्यमातून करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. चौकीचे उद्घाटन आँचल दलाल, पोलीस अधीक्षक, रायगड यांच्या शुभहस्ते झाले.

अलिबाग एस.टी. स्टँड परिसरात आयोजित या समारंभाला उपनगराध्यक्ष ॲड. मानसीताई म्हात्रे, डीवायएसपी माया मोरे, पोलीस निरीक्षक किशोर साळे पोलिस निरीक्षक सरिता चव्हाण अलिबाग आगार प्रमुख देवरे यांच्यासह स्थानिक मान्यवरांची उपस्थिती लाभली. पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी एस.टी. स्टँड परिसरातील वाढती वर्दळ लक्षात घेता ही पोलिस चौकी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले. सध्या AI च्या युगात पोलीस विभाग देखील AI टूल किट चा वापर करीत आहे . त्याचाच एक भाग म्हणजे माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक , कोकण परिक्षेत्र श्री संजय दराडे सरांच्या संकल्पनेतून समुद्र संदेश या व्हाट्सअप चैनल ची सुरुवात करण्यात आलेली आहे या चौकीच्या तीनही बाजूला समुद्र संदेश चैनल ला कशाप्रकारे जॉईंट व्हायचे याबाबत माहिती देण्यात आलेली आहे व सदर चैनल च्या माध्यमातून नागरिकांमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या विषयांवर जनजागृती पर मेसेज दिले जात असतात.
त्याचप्रमाणे माननीय पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल मॅडम यांच्या संकल्पनेतून नागरिकांना पोलीस स्टेशन येथे जाऊन तक्रार करणे सहज व सुखकर व्हावे याकरिता न्याय सारथी या एप्लीकेशन ची तसेच संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू असलेले अवैध धंदे अनुचित प्रकार याबाबतची माहिती नागरिकांनी तात्काळ पोलीस विभागाला कळविणे सहज सोपे व्हावे यासाठी रायगड दृष्टी हे ॲप कार्यान्वित करण्यात आलेले आहे. त्याबाबत देखील चौकिच्या तीनही बाजूला सर्वसामान्य नागरिकांना माहिती मिळण्याचा दृष्टिकोनातून बॅनर्स / माहितीपर फलक लावण्यात आलेले आहे. तसेच नागरिकांना वेगवेगळ्या विभागांना त्यांच्या अडचणीच्या दृष्टिकोनातून तात्काळ संपर्क साधने शक्य व्हावे याकरिता महत्त्वाचे संपर्क क्रमांक देखील चौकीवर लावण्यात आलेले आहेत. अशाप्रकारे आधुनिक AI तंत्रज्ञानाच्या युगात ही चौकी देखील आधुनिक अशी असून प्रत्यक्ष तसेच AI टुलकीच्या माध्यमातून नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची भूमिका बजावणारी ठरणार आहे , असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पोलिस व नागरिक यांच्यातील समन्वय अधिक बळकट होईल, असेही त्यांनी सांगितले.

यशोधन पतसंस्थेचे चेअरमन शेखर वागळे, व्हाइस चेअरमन मन्सूर सैय्यद, सदस्य व सभासद यांनी या उपक्रमात पुढाकार घेतला. संस्थेच्या सामाजिक बांधिलकीतून हे नूतनीकरण करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

फीत कापून चौकीचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमामुळे अलिबाग शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम होईल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.