अलिबाग (प्रतिनिधी) : खालापूर पोलिसांनी रिसॉर्टमध्ये राहण्यासाठी आलेल्या पाहुण्यांच्या खोलीतील सुमारे १८ लाख ७६ हजार ५०० रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीचा गुन्हा उघडकीस आणत तिघांना अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी खालापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक ६५/२०२६ नोंद करण्यात आला आहे. फिर्यादी हे आपल्या नातेवाईकांच्या विवाह सोहळ्यानिमित्त खैराट गाव हद्दीतील ‘सॉल्ट रिसॉर्ट अँड ओलियंडर फार्म’ येथे २५ फेब्रुवारी २०२६ रोजी वास्तव्यास आले होते. त्यांनी खोलीतील लॉकरमध्ये सोन्याचे व हिऱ्याचे दागिने तसेच ६५०० रुपये रोख रक्कम ठेवली होती. हळदी समारंभासाठी बाहेर गेल्यानंतर अज्ञात व्यक्तींनी मास्टर किल्लीच्या साहाय्याने लॉकर उघडून १८,७०,००० रुपयांचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली.
तांत्रिक तपास व चौकशीतून पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर मयूर किसन आगिवले (वय २४), प्रवीण कृष्णा सगणे (वय २५) व ओंकार दत्ता सरोदे (वय २५), सर्व रा. कर्जत, यांना ३ मार्च २०२६ रोजी अटक करण्यात आली. आरोपींकडून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास सुरू असून नागरिकांनी कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Home ताज्या बातम्या खालापूरमध्ये रिसॉर्टमधील १८.७६ लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी उघड; तिघांना अटक









