मंगेश वाकडीकरांना शुभेच्छा; सामाजिक कामांवर केणी यांच्यासोबत चर्चा


रायगड (प्रतिनिधी) : रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांना शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी अंबेपूर जिल्हा परिषदेच्या सदस्य रसिका केणी उपस्थित होत्या.
या भेटीत विविध सामाजिक उपक्रम आणि जिल्ह्यातील विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांच्या मूलभूत सुविधा, ग्रामीण भागातील समस्या तसेच प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर विचारविनिमय करण्यात आला.
तसेच आगामी काळात सामाजिक बांधिलकी जपत अधिक प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या भेटीमुळे स्थानिक पातळीवरील विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.