मुरुड (प्रतिनिधी) : गुढीपाडव्याच्या उत्सवी वातावरणात मुरुड येथे पारंपरिक बैलगाडी शर्यतींचा थरार रंगला. या शर्यतीच्या अंतिम फेरीत आद्य अमित नाईक यांनी उत्कृष्ट कामगिरी करत निर्विवादपणे प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या बैलगाडीने वेग, समन्वय आणि नियंत्रण यांचा सुरेख मिलाफ दाखवत प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले.
या स्पर्धेत परिसरातील अनेक नामांकित स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. अंतिम फेरी अतिशय रोमांचक ठरली असून प्रेक्षकांनी मोठ्या उत्साहात शर्यतीचा आनंद लुटला. विजेत्या आद्य अमित नाईक यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या बैलगाडी शर्यतीमुळे पारंपरिक क्रीडेला चालना मिळाली असून ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.





