अलिबाग (प्रतिनिधी): रायगड जिल्हा परिषदेत समाज कल्याण सभापतीपदी श्री. नारायण धामसे यांची निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या पार्श्वभूमीवर मा. सुभाष उर्फ पंडितशेठ पाटील यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.
यावेळी पाटील यांनी धामसे यांच्या कार्यक्षमतेवर विश्वास व्यक्त करत, समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रभावी योजना राबवल्या जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच, त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील वंचित व गरजू घटकांच्या प्रश्नांना न्याय मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
धामसे यांच्या निवडीमुळे जिल्हा परिषदेत समाजाभिमुख कामांना चालना मिळणार असून, विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातील, असे मतही व्यक्त करण्यात आले.





